छगन भुजबळांची आज जंगी सभा; मोठा निर्णय

...

Updated: Jun 10, 2018, 08:49 AM IST
छगन भुजबळांची आज जंगी सभा; मोठा निर्णय title=

पुणे: प्रदीर्घ काळ कारागृहात घालवून जामीनावर बाहेर आलेले राज्याचे माजी उपुमख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते छगन भुजबळ आज (रविवार, १० जून) जाहीर कार्यक्रमात सहभागी होत आहेत. कारागृहातून बाहेर आल्यावर छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर जाणार की, अन्य पर्यायांवर विचार करणार? याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, आपण आपली भूमिका राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरूनच मांडू असे भुजबळ स्पष्ट केले होते. दरम्यान, बराच काळ अनेक विषयांवर मौन बाळगून असलेले छगन भुजबळ आजच्या सभेत काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा पुणे येथे आज समारोप होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी भुजबळ पुण्यात आले आहेत. अर्थात, भुजबळांचे वलय पाहता या कार्यक्रमाचे रूपांतर जंगी सभेत होणार अशी खात्री राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

...अनेकांचा अभारी. पण, भूमिका राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर मांडेन

महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे प्रदीर्घ काळ ते तुरूंगात होते. अखेर जामीन मंजूर झाल्यावर भुजबळ कारागृहाबाहेर आले. दरम्यान, हल्लाबोल यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी भुजबळ पुण्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी महात्मा फुले वाड्यास भेट दिली. तसेच, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रिबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केले. या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी भुजबळांशी संवाद साधला. या वेळी 'गेल्या काही दिवसांत विविध पक्षांचे नेते मला भेटण्यासाठी आले. त्या सर्वांचा मी आभारी आहे. मात्र, त्यांच्या भेटीमुळे मी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर जाणार की नाही, असे अनेक तर्कवितर्क सुरू झाले होते. परंतु, मी माझी पुढील भूमिका राष्ट्रवादीचच्या व्यासपीठावरच मांडणार आहे,' असे भुजबळ यांनी सांगितले.

काय बोलणार भुजबळ?

दरम्यान, आज भुजबळ काय बोलणा, काय भुमिका व्यक्त करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, कारागृहातून बाहेर आल्यापासून भुजबळ यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण, गेल्या काही दिवसात भुजबळ यांना भेटण्यासाठी राजकीय वर्तुळासह इतर अनके क्षेत्रातील मंडळींनी गर्दी केली होती. अद्यापही भेटींचा हा सिलसिला सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या आजच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.