New Bajaj Chetak electric scooter: बजाज चेतक स्कूटर अनेक भारतीयाचं पहिलं प्रेम आहे. 80 आणि 90 च्या दशकात बजाज चेतक स्कुटरने धुमाकूळ घातला होता. 52 वर्षानंतर Bajaj Chetak नव्या अवतारात लाँच झाली आहे. चेतक 35 सीरीज ('Chetak 35 Series) असे या नव्या व्हर्जनचे नाव आहे. इलेक्ट्रीक व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आलेले बजाज चेतक स्कूटरचे हे आजपर्यंतचे सर्वात बेस्ट मॉडेल आहे. जाणून घेऊया या नव्या बजाज चेतकमध्ये फिचर्स काय असतील? याची किंमत किती असेल?
1972 मध्ये पहिली चेतक स्कूटर पुण्यातील आकुर्डी येथील बजाज ऑटोच्या उत्सा प्लांटमध्ये लाँच करण्यात आली. यानंतर जवळपास 52 वर्षांनंतर कंपनीने त्याच प्लांटमधून चेतक इलेक्ट्रिकचे सर्वात बेस्ट मॉडेल लाँच केले आहे. चेतक 35 सीरीज या नव्या स्कूटरचा लुक पाहिला असता डिजाईनममध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. या नव्या स्कूटरचा लुक हा जुन्या स्कुटरप्रमाणेच ठेवण्यात आला आहे. डिजाईनमध्ये किंचीतसा बदल करण्यात आला आहे. नवीन बॅटरी, नवीन कंट्रोल सिस्टीम आणि नवीन मोटर पॅनल देण्यात आले आहे. स्कूटरची चाकेही थोडी मागे घेण्यात आली आहेत. यामुळे स्कूटरच्या आकारात बदल झाला आहे. स्कूटरमध्ये 725 मिमी लांब अशी स्पेसियश सीट मिळलाी आहे.
Chetak 35 Series स्कूटमध्ये कंपनीने नवीन चेतकमध्ये 3.5kWh क्षमतेचा नवीन बॅटरी पॅक दिला आहे. सिंगल चार्ज रेंजसह 153 Km इतकी रेंज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे. यात कंपनीने 950 वॅट ऑनबोर्ड चार्जरची सुविधाही दिली आहे. फक्त 3 तासात बॅटरी 80% पर्यंत चार्ज होते असा दावा देखील कंपनीने केला आहे. घरगुती पॉवर सॉकेटच्या मदतीने देखील बॅटरी सहजपणे चार्ज करू शकता येवू शकते.
दोन प्रकारांमध्ये Chetak 35 Series लाँच करण्यात आली आहे. त्याच्या बेस व्हेरिएंटची (3502) स्टार्टिंग प्राईज 1,20,00 रुपये आहे. तर, त्याच्या टॉप व्हेरिएंटची (3501) किंमत 1,27,243 रुपये (एक्स-शोरूम, बेंगळुरू) आहे. दोन्ही व्हेरियंटचे अधिकृत बुकिंग सुरू झाले आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून Chetak 35 Series बुक करता येवू शकते.