नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांना फसवण्याचा धंदा

ऑनलाईन प्लेसमेंट सर्व्हिसच्या नावाखाली फसवणुकीचा धंदा

Updated: Dec 26, 2019, 07:30 PM IST
नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांना फसवण्याचा धंदा title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : ऑनलाईन नाव नोंदणी करुन प्लेसमेंट सर्व्हिस म्हणजे नोकरी देण्याचं काम अनेक संस्था करतात. त्यासाठी ऑनलाईन बायोडेटा भरावा लागतो. शिवाय सदस्यनोंदणीसाठी फी ही भरावी लागते. ऑनलाईन प्लेसमेंट सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांच्या नावाखाली आता काही लोकांनी फसवणुकीचा धंदा सुरु केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. मुंबईतल्या एका तरुणीला मोबाईलवर एका प्लेसमेंट कंपनीचा प्रतिनिधी असल्याचं सांगणारा फोन आला. 

तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी असल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर दहा रुपयांची मेंबरशिप फी भरण्यासाठी लिंक पाठवली. या लिंकवर तरुणीनं पैसे भरले शिवाय तिला आलेले ओटीपी तरुणीनं भामट्याला सांगितले. काही वेळातच तरुणीच्या खात्यातील हजारो रुपये गायब करण्यात आले. GFXOUT ऑनलाईन गंडा घालणाऱ्यांनी आता बेरोजगारांना टार्गेट केल्याचं यावरुन समोर आलंय. त्यामुळं तरुणांनीही नोकरीच्या आशेनं फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

ऑनलाईन लुटणारे दूरच्या राज्यात बसून हा फसवणुकीचा धंदा करतात त्यामुळं त्यांना पकडणं आणि शोधणं पोलिसांना कठीण असतं. शक्यतो अशा भुलथापांना बळी पडू नका. फोनवर किंवा मेलवर आलेल्या एखाद्या ऑफरबाबत डोळसपणे विचार करा... राहा सावध... नाहीतर तुम्हीला फसवले जाल.