पंतप्रधान हत्येच्या कटात सामील झाल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल

आरोपपत्र दाखल करण्यात आलेले उर्वरित ५ जण फरार आहेत. 

Updated: Nov 16, 2018, 07:35 AM IST
पंतप्रधान हत्येच्या कटात सामील झाल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल title=

पुणे : पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेचे आयोजक सुरेंद्र गडलिंग आणि अन्य पाच जणांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येच्या कटात सामील झाल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केलंय. आरोपपत्र वेळत दाखल न केल्यानं सुरेंद्र गडलिंग यांनी पोलिसांविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. आरोप पत्र दाखल केल्यानं अटक करण्यात आलेले आरोपी जामिनासाठी अर्ज करु शकतात.

५ जण फरार

६ जून रोजी अटक करण्यात आलेले रोना विल्सन, सुधीर ढवळे, शोमा सेन, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत यांच्यासह १० जणांविरुद्ध पुणे सत्र न्यायलायात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.

आरोपपत्र दाखल करण्यात आलेले उर्वरित ५ जण फरार आहेत.

एकूण ५१६० पानांचं हे आरोपपत्र आहे.