वायरल व्हिडिओ : वाघानं केली जंगली कुत्र्यांची शिकार

वाघानं जंगली कुत्र्याची शिकार करणं ही तशी फार दुर्मिळ घटना... चंद्रपूरलगतच्या जुनोना तलावाजवळ बफर क्षेत्रातली ही घटना आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही वायरल झालेला दिसतोय. ही घटना नेमकी केव्हा घडली, हे मात्र कळू शकलं नाही. 

Updated: Apr 18, 2018, 09:26 PM IST
वायरल व्हिडिओ : वाघानं केली जंगली कुत्र्यांची शिकार  title=

चंद्रपूर : वाघानं जंगली कुत्र्याची शिकार करणं ही तशी फार दुर्मिळ घटना... चंद्रपूरलगतच्या जुनोना तलावाजवळ बफर क्षेत्रातली ही घटना आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही वायरल झालेला दिसतोय. ही घटना नेमकी केव्हा घडली, हे मात्र कळू शकलं नाही. 

जंगली कुत्र्यांच्या कळपातला एक कुत्रा वाघानं ठार केला... मग इतर कुत्र्यांनी त्या कुत्र्याला वाघाच्या तावडीतून सोडवण्यासाठी बराच प्रयत्न केला... पण त्याला काही यश आलं नाही... पण वाघानं त्याचा दरारा दाखवत सगळ्या कुत्र्यांना पिटाळून लावलं.