कापूस खाणाऱ्या नागाचा व्हिडिओ व्हायरल

सर्पमित्रांकडून नागाची सुटका 

Updated: Dec 14, 2019, 04:04 PM IST
कापूस खाणाऱ्या नागाचा व्हिडिओ व्हायरल  title=

चंद्रपूर : जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात साखरवाही येथील एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. उंदीर, पक्षाची अंडी खाणाऱ्या वागाने चक्क कापूस खाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेची सगळीकडेच चर्चा होत असून याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  नागाच्या पोटातून चक्क कापसाचे बोळे बाहेर काढण्यात आले असं या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. 

साखरवाही येथील सुनील रासेकर यांच्या घरी नाग आढळून आला. त्यानी तात्काल सर्पमित्रांना याची माहीती दिली. सर्पमित्रांनी तो नाग पकडला मात्र त्यांना नागाच्या पोटात काहीतरी असल्याची शंका आली. म्हणून त्यानी नागाला सुरक्षीत अशा समतल जागेवर सोडले. त्यानंतर या नागाने चक्क पोटातून कापसाचे बोळे बाहेर काढले.

कापसाच्या गंजीत दडुन बसणारे उंदीर तसेच पक्षांचे अंडी याच्या भक्ष्यासह कापूसही पोटात गिळला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तज्ञांनी देखील अशी माहिती दिली आहे. पण व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्य व्यक्त करत आहेत. (VIDEO : हरणटोळ सापानं केली नानेटीची शिकार)

काही दिवसांपूर्वीच एका सापाने दुसऱ्या सापाला खाल्याचा व्हिडिओ समोर आला होता. झाडावर आढळणारा हरणटोळ साप. या निमविशारी सापानं चक्क नानेटी या सापाची शिकार केली आहे. खरंतर हरणटोळ हा साप प्रामुख्यानं सरडे, पाली, पक्षी यांची शिकार करतो. त्यानं इतर सापांना खाल्ल्याची उदाहरणं फारच दुर्मिळ आहेत. असंच एक उदाहरण कोल्हापुरातील राधानगरी अभयारण्यात पहायला मिळालं आहे. वाईल्डलाईफ फोटोग्राफर हरिष कुलकर्णी यानं हरणटोळ सापाल नानेटी सापाची शिकार करताना पाहिलं आणि त्याचं चित्रिकरण केलं.

हरणटोळच्या शिकार करण्याची पद्धत अशी आहे की, तो कुणाचा माग काढत जात नाही. झाडावरती एके ठिकाणी 5 ते 6 तास थांबून निसर्गाशी मिळतं जुळतं होतं. त्याच्या आसपास येणार जे भक्ष आहे त्यावर ते अवलंबून असतं. हरणटोळ दुसऱ्या सापाची शिकार करतो, हे चित्र दुर्मिळ असल्याचं वाईल्ड लाईफ फोटोग्राफर हरिष कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.