चंद्रकांत पाटील यांचा शरद पवार यांच्यावर पलटवार

भाजपकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. त्यानंतर पवारांच्या दौऱ्यावरही टीका केली.

Updated: Jun 10, 2020, 12:52 PM IST
चंद्रकांत पाटील यांचा शरद पवार यांच्यावर पलटवार title=
संग्रहित छाया

कोल्हापूर : भाजपकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही जोरदार टीका केली होती. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोकण दौऱ्याला उशीर झाला, अशी टीका करणाऱ्या भाजप नेत्यांनी केली होती. तसेच आघाडी सरकार हे सर्कशीप्रमाणे काम करत असल्याची टीका केली होती. त्यानंतर पवार यांनी भाजपला चांगलेच सुनावले होते. सर्कसमध्ये विदुषकाचे काम असते, असा टोला पवारांनी भाजपला लगावला होता. त्यानंतर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांच्या विधानावर पटलवार केला आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना उत्तर दिले आहे. महाराष्ट्रात सर्कस सुरु आहे हे शरद पवारांनी मान्य केले आणि त्या सर्कसमध्ये सर्व प्राणी आहेत हे देखिल मान्य केले आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणालेत. त्याचवेळी  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी आपण कोणाबद्दल बोलतोय, याचे भान ठेवावे. साहेबांवर टीका करताना त्यांनी जनाची नाही किमान मनाची लाज तरी बाळगावी, अशी टीका मंत्री आणि राष्ट्रादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली. 

कोकण दौऱ्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पाटील यांनी सडकून टीका केली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते गेल्यानंतर तीन महिने घरात बसलेल्या मुख्यमंत्र्यांना बाहेर पडावे असे वाटले तर दुसरीकडे आता चार दिवसांनंतर शरद पवार यांनाही कोकण दौरा करावासा वाटतोय, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. तसेच या सरकारला नुकसानीचा अंदाजच आलेला नाही, असाही आरोप केला. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

 शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात जितेंद्र आव्हाड यांच्यापेक्षा जास्त आदर आहे, असे सांगत चंद्रकांत पाटील यांचं आव्हाडांच्या टीकेला उत्तर दिले आहे.