चंदक्रांत पाटीलांची पृथ्वीराज चव्हाणांवर कडाडून टीका

Updated: May 18, 2018, 09:47 PM IST

मुंबई : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केली. अपघाताने त्यावेळी झालेल्या मुख्यमंत्र्यांना राज्याचे प्रश्न सोडविण्याची जाण नसल्याचा सणसणीत टोलाही लगावला. पृथ्वीराज चव्हाण हुशार आहेत त्यामुळे त्यांनी त्यांची बुद्धिमत्ता दिल्लीत दाखवावी, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आपणास योग्यतेचं काम देतील खोचक सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला.

चंदक्रांत दादा पाटीलांची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर कडाडून टीका .... 

अपघाताने झालेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राज्याचे प्रश्न सोडविण्याची जाण नाही, फाईलवर  सही करताना देखील लकवा आल्यासारखे हात करतात, अश्या माजी मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या कराड नगरपालिकेत निवडून आलेले नगरसेवक १ दिवस देखील टिकवता आले नाहीत. हे त्याचे कर्तृत्व .... पृथ्वीराज चव्हाण हुशार आहेत त्यांनी आपली बुद्धिमत्ता दिल्लीत दाखवावी,  नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपणास आपल्या योग्यतेचे काम देतील  इथे राजकारणात तुमचे काम नाही असा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सणसणीत टोला राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी  कराड येथील मलकापूर येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात लगावला.