कोल्हापूर : 102 व्या घटना दुरुस्तीवरून अशोक चव्हाण यांनी कोर्टाचा अवमान केला आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे गरज पडली तर आम्ही कोर्टात जाऊ असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील ( chandrakant patil ) यांनी केलं..ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
या सरकारमधील एकाही मंत्र्याला मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत ( Maratha reservation ) अभ्यास नाही. आपले अपयश झाकण्यासाठी सरकारचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे.
मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. कोर्टात योग्य पद्धतीने मांडणी करणे गरजेचे आहे, अन्यथा मराठा समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो.असं देखील आज चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
सचिन वाझे प्रकरणाची मुळं खूप लांब लांब प्रयत्न आहेत. आज संध्याकाळ पर्यंत मोठी घडामोड होऊ शकते. हे सरकार प्रत्येक पातळीवर अपयशी ठरलं आहे. आज एका मंत्र्याचा राजीनामा देखील घेतला जाऊ शकतो असंही चंद्रकांतदादा पाटील म्हणालेत.