डॉ. लहानेंच्या टीमकडून हजारांहून अधिकांना मिळाली नवी दृष्टी

मोतीबिंदू तसंच विविध आजारांमुळे कायमस्वरूपी डोळ्यांची दृष्टी गमावलेल्या ५० रुग्णांना जळगावातील मोतीबिंदूमुक्त अभियान कार्यक्रमात नव्यानं दृष्टी मिळालीय.

Updated: Dec 2, 2017, 04:20 PM IST
डॉ. लहानेंच्या टीमकडून हजारांहून अधिकांना मिळाली नवी दृष्टी  title=

जळगाव : मोतीबिंदू तसंच विविध आजारांमुळे कायमस्वरूपी डोळ्यांची दृष्टी गमावलेल्या ५० रुग्णांना जळगावातील मोतीबिंदूमुक्त अभियान कार्यक्रमात नव्यानं दृष्टी मिळालीय.

शिबिरात १ हजार ९४ रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी ५० रुग्ण हे डोळ्यांनी पूर्णपणे अंध झाले होते.

या अंध रुग्णांवर डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्या टीमनं यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. त्यामुळं कायम अंधत्व प्राप्त झालेल्या रुग्णांना पुन्हा एकदा दृष्टी देण्यात यश आलंय. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्यात सध्या मोतीबिंदू मुक्त अभियानाची सुरवात झालीय.