पिंपरीत अतिवेगाने घेतला तरुणाचा बळी

Updated: May 14, 2018, 03:44 PM IST

पिंपरी : आजच्या तरुणाईला वेगाचं प्रचंड आकर्षण आहे. मात्र या अति वेगाच्या प्रेमाने पिंपरी चिंचवड मधील एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. ताशी 180 पेक्षा अधिक वेगाने कार चालवत त्याचं लाईव्ह करणारा 20 वर्षीय तरुण शिवम जाधव याचा अपघातात मृत्यु झालाय. स्पीड लाईव्ह करण्याच्या नादात शिवमचा गाडीवरील ताबा सुटला आणि अपघातात झाला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यु झाला. अपघातग्रस्त गाडीची अवस्था बघून आपल्या लक्षात येऊ शकत की गाडीचा किती वेग असेल...या अपघातादरम्यांन शिवमच्या मोबाइल वरुन लाईव्ह करणारा त्याचा आतेभाऊही गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील ग्रेड सेप्रेटर मार्गावर हा अपघात घडला होता.  शिवम हा एकुलता एक मुलगा होत. त्याच्या अशा अपघाती निधनाने  जाधव कुटुंबाला मोठा धक्का बसला. शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय.