होम क्वॉरंटाईन रुग्णांना घरी ऑक्सिजन सिलेंडर ठेवता येईल का? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं

कोरोना संसर्गामुळे मुंबईची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले आहे

Updated: Apr 16, 2021, 01:55 PM IST
होम क्वॉरंटाईन रुग्णांना घरी ऑक्सिजन सिलेंडर ठेवता येईल का? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं title=
representative image

मुंबई : कोरोना संसर्गामुळे मुंबईची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले आहे.  त्यामुळे घरीच आयसीयु सुविधा प्रधान करण्यात येत आहे. परंतु या सेवेचे मोठे शुल्क आकारले जात आहे.

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार ज्या गतीने संपूर्ण देशात कोरोना संसर्ग पसरत आहे. त्यादृष्टीने विचार केल्यास रुग्णांना तातडीने ऑक्सिजनची आवश्यकता भासते. त्यामुळे डॉक्टरांचे म्हणणे आहे की, घर आणि कारमध्ये आगीसारख्या आणिबाणीच्या परिस्थितीशी लढण्यासाठी फायर सिलेंडर ठेवले जाते. तसेच कोरोना रुग्णांसाठी घरीच ऑक्सिजन सिलेंडरची सोय केल्यास गंभीर रुग्णांचे प्राण वाचू शकतात.

किती मदत होईल ऑक्सिजन सिलेंडरची?

सीएमओ डॉ. एन के गुप्ता यांचे म्हणणे आहे की, आणिबाणीच्या परिस्थितीत कोरोना रुग्णाच्या घरात असलेला ऑक्सिजन सिलेंडर मदतगार ठरू शकतो.
रुग्णालयात पोहचण्यास अनेकवेळा उशीर होतो. घरी ऑक्सिजन लावल्यास डॉक्टरांना जरूर दाखवने गरजेचे आहे. गरज नसेल तर उगाच ऑक्सिजन सिलेंडरचा प्रयोग करू नका.

कसे लावतात ऑक्सिजन सिलेंडर?

एमएमजी रुग्णालयाचे वरिष्ठ डॉ. आर पी सिंह यांचे म्हणणे आहे की, कोरोनामुळे रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली तर, घरात ठेवलेल्या ऑक्सिजनचा चांगला उपयोग होऊ शकतो.  शरिरात वेळेवर ऑक्सिजन मिळाल्यास कोणत्याही प्रकारची वाईट घटनेपासून वाचू शकतो.

कोणते सिलेंडर विकत घ्यावे?

श्वास घेण्यास अडचण असेल तर, घरात पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर ठेवता येईल.  अशा सिलेंडरसोबतच मास्क सुद्धा मिळते. किंवा मास्क वेगळे देखील खरेदी करता येऊ शकते. रुग्णांची स्थिती गंभीर असल्यास ऑक्सिजन सिलेंडर प्राण वाचवू शकते.  हे सिलेंडर लावून रुग्णालयापर्यंत रुग्णाला पोहचवचा येऊ शकते.

बाजारात किंमत किती?

ऑक्सिजन सिलेंडर ऑनलाईन आणि ऑफलाईन बाजारात मिळतात. 75 लीटर सिलेंडरची किंमत साधारण 5 हजार रुपये आहे. सिलेंडरमध्ये ऑक्सिजन कॉम्प्रेस करून ठेवला जातो.

बाजारात उपलब्धता कमी 

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सिलेंडरची उपलब्धता कमी आहे. गरजेनुसार सप्लाय करणे कठीण आहे.