'मुख्यमंत्री शिंदे यांचा मलाही फोन आला होता' शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

शिंदे गटात सामील होण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून फोन, पण... 

Updated: Jul 21, 2022, 02:31 PM IST
'मुख्यमंत्री शिंदे यांचा मलाही फोन आला होता' शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद :  शिवसेनेमधून (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर आता शिवसेनेच्या वतीने जोरदार पक्षबांधणी मेळावे घेण्यात येत आहे. यादरम्यान काही जण आपल्याला शिंदे गटात जाण्यासाठी पैशांची ऑफर आल्याचं देखील सांगत आहेत. काल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील बैठक आयोजित केली होता. यात मलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. 

पण आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. शिवसेना म्हणून आपण आमदार झालो, काही आमदार आपल्याला सांगतील मी तुझ्यासाठी हे केलं, मी तुझ्यासाठी ते केलं पण एक लक्षात ठेवा शिवसैनिकांनी त्यांना आमदार केलं आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. 

उत्तर भारतीयांचा शिंदे गटाला पाठिंबा
दरम्यान, मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर सह एमएमआर क्षेत्रातील हजारो उत्तर भारतीय व उत्तर भारतीय संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आज रात्री ९ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन निवासस्थानी भेट घेणार आहेत. आमदार प्रताप सरनाईक व उत्तर भारतीय आघाडीचे विक्रमप्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी उत्तर भारतीय बांधवांकडून मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करून त्यांना तसेच हिंदुत्वाच्या मुद्यावर स्थापन झालेल्या युती सरकारला पाठिंबा दिला जाणार आहे.