दहावीच्या विद्यार्थ्याचा बसखाली चिरडून मृत्यू

दहावीत शिकणाऱ्या मुलाचा एसटीखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे 

Updated: Feb 15, 2019, 06:47 PM IST
दहावीच्या विद्यार्थ्याचा बसखाली चिरडून मृत्यू title=
संग्रहित छाया

उल्हासनगर : दहावीत शिकणाऱ्या मुलाचा एसटीखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. कॅम्प ४ भागातल्या व्हीनस चौकात ही घटना घडली. प्रजापती असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो उल्हासनगरच्या कॅम्प ५ मध्ये राहात होता. या घटनेनंतर बस चालकाने विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठत आत्मसमर्पण केले. या घटनेमुळे पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

उल्हासनगरमधील कॅम्प ४ भागातल्या व्हीनस चौकात आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास  तो सायकलवरून कॅम्प ३ भागातल्या भारती हिंदी स्कूलमध्ये जायला निघाला होता. मात्र व्हीनस चौकात तो एसटी बसखाली आला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बस चालकाने विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठत आत्मसमर्पण केलं. या घटनेमुळं पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.