सातारा : राज्यात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीला सुरुवात झाली आहे. साताऱ्यातही आज बैलगाडा शर्यतीचा धुराळा उडाला. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने साताऱ्यातल्या देगावमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं.
या शर्यतीसाठी प्रचंड गर्दी जमली होती. स्वत: खासदार उदयनराजे यांनी या शर्यतीला हजेरी लावली. यावेळी राजेंची खास स्टाईल उपस्थितींना पाहिला मिळाली.
राजेंनी बैलगाड्यावर उभं राहून हातात कासरा घेतला. आणि खास आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवली. त्यामुळे हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या बघ्यांना बैलगाडा शर्यतीसोबत राजेंची खासद झलक पाहण्याचीही संधी मिळाली. या स्पर्धेत तब्बल 200 बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता.