नागपूर : लग्नाचा दिवस हा प्रत्येक मुला-मुलीसाठी महत्वाचा दिवस असतो, तो दिवस त्यांच्या नेहमी लक्षात रहावा असे त्यांना वाटत असते. तसेच सगळेच त्यादिवशी त्यांना पाहात रहावे इतकं सुंदर दिसावं असं त्यांना वाटत असतं. एका लग्नात असा किस्सा घडला की, ते लग्न सगळ्यांना लक्षात तर राहिल परंतु एका वेगळ्याच गोष्टीसाठी.
महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात जबरदस्तीने एका महिलेचं लग्न तिच्या घरच्यांकडून ठरवले गेले होते. परंतु या मुलीकडे काही पर्याय नव्हता मग अचानक त्या मुलीला एक युक्ती सुचली आणि तिने आपल्या लग्नात पोलिसांना फोन करुन बोलावलं.
मंगळवारी दुपारी 12 वाजता हा विवाह रामटेकजवळील रिसॉर्टमध्ये होणार होते. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मुहूर्ताच्या काही क्षण आधी एका महिलेने पोलिस कंट्रोल रूमला फोन लावला आणि सांगितले की, तिला हा नवरा आवडला नाही आणि तिचे कोणत्या दुसऱ्या व्यक्तीशी प्रेम आहे. परंतु घरचे लोकं तिचे जबरदस्ती लग्न करुन देत आहेत, म्हणून तिला हे लग्न करायचे नाही.
पोलिस लग्न स्थळी आल्यानंतर आणि संपूर्ण गोष्ट कळल्यानंतर वराच्या कुटुंबातील लोकं संतप्त झाले. त्यामुळे भांडणे झाली त्यानंतर इन्स्पेक्टर प्रमोद मकेश्वर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मध्यस्थि केली आणि दोन्ही कुटुंबातील सदस्यांना रामटेक पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर दोन्ही कुटूंबातील लोकांच्या संमतीने हे लग्न रद्द झाले.