आताची सर्वात मोठी बातमी! गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नाही; परमबीरांच्या पत्रावर शरद पवारांचे आक्षेप

परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर राज्यातील राजकारणात खळबळ  उडाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली

Updated: Mar 22, 2021, 01:49 PM IST
आताची सर्वात मोठी बातमी! गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नाही; परमबीरांच्या पत्रावर शरद पवारांचे आक्षेप title=

नवी दिल्ली : परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर राज्यातील राजकारणात खळबळ  उडाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण करत त्यांच्या राजीनाम्याची गरज नाही असे पवार यांनी म्हटले आहे. 

परमबीर सिंह यांच्या पत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची पुन्हा मागणी केली आहे. याप्रकरणाची चौकशी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याकडून होणे अपेक्षित आहे.

अनिल देशमुख - सचिन वाझे यांच्यातील भेटीवरही पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माजी आयुक्तांनी केलेल्या आरोपामधील तारखांवेळी अनिल देशमुख कोव्हिड पॉझिटिव्ह असल्यामुळे क्वारंटाईन होते.  त्यामुळे माजी आयुक्तांच्या आरोपात तथ्य नाही.  असे पवार यांनी सांगितले.

हसमुख हिरेन यांच्या हत्येचा तपास महाराष्ट्र एटीएसकडून योग्य दिशेने सुरू असताना, त्याची दिशा भरकटवण्यासाठी माजी पोलीस आयुक्तांनी हे आरोप केले असावेत.  त्यामुळे आरोपांमध्येच तथ्य नसल्याने गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची तसेच चौकशीची गरज नाही. असेही पवार यांनी म्हटले आहे.