एसटी कर्मचा-यांना बोनस जाहीर; रक्कम पाहून कर्मचारी नाराज

एसटी कर्मचा-यांना 6 हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. यामुळे कर्मचारी नाराज झाले आहेत. 

Updated: Nov 9, 2023, 04:41 PM IST
एसटी कर्मचा-यांना बोनस जाहीर; रक्कम पाहून कर्मचारी नाराज title=

ST Worker Diwali Bonus 2023 : एसटी कर्मचा-यांना बोनस जाहीर झाला आहे.  एसटी कर्मचा-यांना 6 हजार रुपये इतका बोनस दिला जाणार आहे. बोनसची रक्कम ऐकून कर्मचारी नाराज झाले आहेत. राज्य सरकारनं एसटी कर्मचा-यांना बोनसच्या रुपात दिवाळी भेट दिली. मात्र, कर्मचाऱ्यांचे समाधान झालेले नाही.

सिडकोच्या  कर्मचाऱ्यांना छप्पर फाड के बोनस मिळालाय. सिडको कर्मचा-यांना तब्बल 50 हजारांचा बोनस जाहीर झालाय. दिवाळीनिमित्त सिडको प्रशासनाने सिडको कर्मचाऱ्यांना तब्बल ५० हजार रुपयांचा बोनस जाहीर केलाय. महामंडळांमध्ये हा सर्वाधिक बोनस आहे. बोनस मिळताच सिडको कर्मचा-यांनी ऑफिसच्या खालीच फटाके लावले. कर्मचा-यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. या घसघशीत बोनसमुळे सिडको कर्मचा-यांची दिवाळी जोरदार साजरी होणार आहे. तर दुसरीकडे ठाणे महापालिकेनं कर्मचा-यांना 21,500 तर  कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 18 हजार 500 रुपयांचा बोनस जाहीर झालाय.