मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान आणि कोंडीमुक्त, 'हे' 12 उड्डाणपुल लवकरच सेवेत

Mumbai Traffic News : मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका व्हावी यासाठी मुंबई महापालिकेकडून नवीन मार्गांची उभारणी करण्यात येते. नवीन मार्गिका, नवीन उड्डाणपूल यामुळे आता लवकरच मुंबईकरांची वाहतुक कोंडीमुक्त होणार आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Mar 18, 2024, 11:22 AM IST
मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान आणि कोंडीमुक्त, 'हे' 12 उड्डाणपुल लवकरच सेवेत  title=

Mumbai News Today: मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होईन त्यांचा प्रवास सुखकर आणि वेगवान करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून अनेक नव्या मार्गिकेसह  उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येत आहे.  दक्षिण मुंबईतील वाहतुकीला दिशा देण्यासाठी हाती घेण्यात आलेल्य  कोस्टल रोडचा पहिला टप्पा खुला करण्यात आला. याचदरम्यान आता मुंबईतील उड्डाणपुलांची दुरुस्ती करुन त्यांच्या मजबुतीकरणाचा निर्णय मुंबई महापालकिने घेतला आहे. यामध्ये 12 उड्डाणपुलांसह भुयारी मार्गांचाही समावेश आहे. या 12 उड्डाणपुलांमुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान होईल. 

मुंबई महापालिकेन पूर्व उपनगरातील आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील उड्डाणपूल आणि पुलांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात 12 उड्डाणपुलांसह भुयारी मार्गाचाही समावेश आहे. याकामासाठी पालिकेने 23 कोटी 68 लाख रुपये खर्च केला असून काही पुलांचे पावसाळ्याआधी, तर काही पुलांचे पावसाळ्यानंतर मजबुतीकरण होणार आहे. यामध्ये सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, महाराष्ट्र नगर भुयारी मार्गाची सुधारणा यांचाही समावेश असणार आहे. 

जुलै 2018 मध्ये अंधेरतील गोखले उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्यानंतर या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर त्याआधी 2017 मध्ये एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलाच्या दुर्घटनेत 22 प्रवाशांना प्राण गमवावा लागला. परिणामी या दुर्घटनेते पादचारी पूल, उड्डाणपुलांची सुरक्षा तपासणी करण्यात आली. ही तपासणी झाल्यानंतर रेल्वे हद्दीतील उड्डाणपूल ,पादचारी पुलांच्या रेल्वे पुलांच्या दुरुस्तीकामे हाती घेण्याचा निर्णय घेतला. 

गेल्या काही वर्षाच अनेक मोठे प्रकल्प हाती घेण्यात आली. आता या प्रकल्पांचे काम जवळपास पूर्ण झाले. तर काही प्रकल्पांचे काम पूर्णत: झाले आहे. तसेच मुंबई शहराचा विकास करायचा असेल तर फक्त मुंबईसाठी प्रकल्प हाती न घेता, आसपास असलेल्या शहरांचा देखील एकत्रित विकास करणे गरजेचे आहे. त्यामुळेच मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA) आणि इतर संस्थांच्या माध्यमातून केंद्र-राज्य आणि स्थानिक स्वराज्या संस्थांची भागिदारी या विकासकामांमध्ये आहे. 

या 12 उड्डाणपुलांची कामे सुरु

  1. कुर्ला एलबीएस जंक्शन येथे सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड
  2. - चेंबूर अण्णाभाऊ साठे उड्डाणपूल
  3. - चेंबूर अमर महल जंक्शन फ्लायओव्हर
  4. - घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड (घाटकोपर)
  5. घाटकोपर GMLR उड्डाणपूल दक्षिण दिशेला
  6. - मुलुंड नवघर उड्डाणपूल
  7. - सायन पनवेल महामार्ग आणि महाराष्ट्र नगर भुयारी मार्गाची सुधारणा
  8. - सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड पूल
  9. - एलटीटी आणि कुर्ला दरम्यान पूल
  10. - सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील कुर्ला परिसरात डबल डेकर उड्डाणपूल.
  11. - चेंबूरमधील स्वामी नारायण उड्डाणपूल
  12. - सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडचा पूर्व द्रुतगती मार्ग (चेंबूर बेल्ट) कनेक्शन