BMC BUDGET : मुंबईकरांसाठी खुशखबर; आपल्या घराशेजारीच मिळणार ही सुविधा

महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला. हा अर्थसंकल्प ४५,९४९ कोटी रूपयांचा असून यातून मुंबईकरांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Updated: Feb 3, 2022, 03:36 PM IST
BMC BUDGET : मुंबईकरांसाठी खुशखबर; आपल्या घराशेजारीच मिळणार ही सुविधा title=

मुंबई : आगामी महापालिका निवडणूक समोर ठेऊन सत्ताधारी शिवसेनेने मुंबईकरांवर नव्या योजनांची खैरात केली आहे. महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला. हा अर्थसंकल्प ४५,९४९ कोटी रूपयांचा असून यातून मुंबईकरांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. २०२१-२२ चे अंदाजित उत्पन्न ७ हजार कोटीहून ४८०० कोटीवर आणले आहे.

या आहेत घोषणा
- ५०० चौ. फुटांखालील घरांना मालमत्ता करातून १०० टक्के सूट देण्यात आली आहे. एकूण १६ लाख १४ हजार जणांना याचा लाभ मिळणार असून यासाठी पालिकेने ४६२ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. 

- मुबंईत कचरा निर्मिती करणाऱ्यांना आता  `वापरकर्ता शुल्क' चा´ द्यावे लागणार आहे. या वापरकर्ता शुल्कातून वर्षाला १७४ कोटींच्या उत्पन्नाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुंबईतील ३५०० उपहारगृहांनाही कचऱ्याकरता हे शुल्क भरावे लागणार आहे. यामधून पालिकेला २६ कोटीचे उत्पन्न मिळणार आहे.

- अनधिकृत बांधकाम आढळल्यास मालमत्ता कराच्या दोन पट दंड
- बेस्ट उपक्रमाला ८०० कोटी रूपयांचा मदतीचा हात
- वॅाट्सअप चॅटबॅाटसाठी ७८ कोटी
- रस्ते सुधारणांकरता २२०० कोटी
- कोस्टल रोडसाठी ३२०० कोटी
- गोरेगांव मुलुंड लिंकरोडसाठी १३०० कोटी
- पुरमुक्त आणि पर्जन्य जल उदंचन प्रकल्पासाठी ५२६ कोटी
- पुलांची दुरूस्ती आणि निर्मितीसाठी १५७६ कोटी
- नद्यांच्या पुनरुज्जीवनाकरता ७६५ कोटी
- दहिसर, पोईसर,ओशिवरा, वालभट्ट  नद्यांच्या पुनरुजीवनासाठी २०० कोटी
- मुंबई अग्निशमन दलाच्या नवीन प्रकल्पांकरता ३६५ कोटी
- महापालिकेच्या मंडईकरता १२१ कोटी
- देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प. 
- कचरा संकलनासाठी १६७.८७ कोटींची तरतूद
- २०० हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रासाठी ४०० कोटी
- मुंबईच्या आरोग्यावर भरीव 2660 कोटीची तरतूद
- भायखळा राणी बागेच्या तिसऱ्या टप्प्यातील विस्तारीकरणासाठी 115 कोटी

महापालिकेला येणे बाकी
- सहाय्यक अनुदान, मालमत्ता कर इत्यादीपोटी शासनाच्या विविध कार्यालयांकडून ६७६८.१६ कोटी
- शिक्षण खात्याकडून सहाय्यक अनुदानापोटी ४८४०.६१ कोटी