रक्तदान होतंय पण रक्त साठवणूक केंद्राचे काय?

रक्तदान होण्यासाठी शासन, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळाचे वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. रक्तदानाचे महत्त्व लोकांना समजविण्याचे होत असल्याचे समाधानकारक चित्रही दिसू लागले आहे. पण मोठ्या प्रमाणात रक्तदान होऊनही दिलेल्या रक्ताची योग्य साठवणुक होते का? आपल्याकडे पुरेशा प्रमाणात रक्तपेढ्या उपलब्ध आहेत का ? याची माहितीही रक्तदात्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कारण हॉस्पीटल्सना रक्त पुरवठा केंद्राची प्रतिक्षा आहे. तर काही केंद्र अद्याप सुरु झाली नसल्याच्या घटना समोर येत आहेत.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 5, 2017, 05:37 PM IST
रक्तदान होतंय पण रक्त साठवणूक केंद्राचे काय? title=

वसई : रक्तदान होण्यासाठी शासन, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळाचे वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. रक्तदानाचे महत्त्व लोकांना समजविण्याचे होत असल्याचे समाधानकारक चित्रही दिसू लागले आहे. पण मोठ्या प्रमाणात रक्तदान होऊनही दिलेल्या रक्ताची योग्य साठवणुक होते का? आपल्याकडे पुरेशा प्रमाणात रक्तपेढ्या उपलब्ध आहेत का ? याची माहितीही रक्तदात्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कारण हॉस्पीटल्सना रक्त पुरवठा केंद्राची प्रतिक्षा आहे. तर काही केंद्र अद्याप सुरु झाली नसल्याच्या घटना समोर येत आहेत.

गरजू रुग्णांना सरकारी किमतीत रक्त उपलब्ध व्हावे यासाठी वसई व मालवणी (मालाड) येथे दोन रक्त साठवणूक केंद्रे सुरू करण्यात आली. राज्य सरकारच्या जीवन अमृत सेवा (ब्लड ऑन कॉल) योजनेअंतर्गत ही रक्त साठवणूक केंद्र सुरु होती. याठिकाणी चार तंत्रज्ञांची गरज असताना एकच तंत्रज्ञ नेमण्यात आल्याने ही सुविधा मिळवताना रुग्णांना अडचणी येत आहेत. दुसरीकडे अन्य चार केंद्रे अद्याप सुरूच झालेली नसल्याचे प्रकरणही समोर आले आहे.

वसई व मालाड येथील साठवणूक केंद्रात ५० ते ६० युनिट (पिशवी) रक्त जमा करता येऊ शकते. वसई या भागात जवळपास रक्तपेढय़ा उपलब्ध नसल्याने रक्त साठवणूक केंद्रामुळे रुग्णांची रक्त मिळविण्यासाठी होणारी लूट थांबणार असल्याची समाधानकारक बातमी होती. यामुळे स्थानिकांना दिलासा मिळेल अशी आशा होती. मात्र ही सेवा पुरविण्यासाठी तंत्रज्ञ रुजू होत नसल्याने सध्या या चारही केंद्रांत एक तंत्रज्ञच उपलब्ध असल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान या गंभीर वृत्ताची दखल घेत राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले की, साठवणूक केंद्रात तंत्रज्ञांची नेमणूक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या महिन्यात या तंत्रज्ञांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच त्यांना रुजू करण्यात येईल.

रक्त साठवणूक केंद्राच्या प्रतिक्षेत

 भायखळ्यातील जे.जे. महानगर रक्तपेढय़ातून मुंबई उपनगरातील रक्त साठवणूक केंद्रात आणले जाते. मात्र अजूनही के. बी. भाभा रुग्णालय (कुर्ला), व्ही. एन. देसाई रुग्णालय (सांताक्रुझ), शताब्दी रुग्णालय (कांदिवली), ई.एस.आय. रुग्णालय मुलुंड) ही चार साठवणूक केंद्र प्रतीक्षेतच आहे.

ब्लड ऑन कॉलबद्दल अधिक जागृतीची गरज

‘१०४’ या दूरध्वनी क्रमांकावर रुग्णालयांनी संपर्क साधला ब्लड ऑन कॉल या योजनेअंतर्गत चार तासांच्या आत थेट रुग्णालयात रक्त पुरविण्याची सुविधा आहे. याबाबतही अधिक जागृती होण्याची गरज आहे. कारण आजही रक्ताची मागणी असलेले मेसेज आपल्याला वाचायला मिळतात. अनेकांना सोयीचा रक्त गटही मिळत नसल्याचेही वास्तव आहे.