मुंबई : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वर उद्या अर्थात बुधवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक १२ ते २ दरम्यान पूर्णपणे बंद राहणार आहे. मुंबई-पुणे महामार्ग उद्या दोन तास बंद राहणार आहे. दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान महामार्गावरील वाहतूक बंद राहील.
पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पनवेलजवळ गँट्री बसवण्याचे काम हाती घेण्यात आल्याने महामार्ग बंद असणार आहे. या काळात पुण्याकडे जाणारी वाहतूक कळंबोली बायपास मार्गे वळविण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली.
दरम्यान, याआधी मुंबई - पुणे एक्सप्रेस वे दोन तास बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक जुन्या मार्गाने वळविण्यात आली आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी दोन ते सायंकाळी चार वाजेपर्यंत बंद होती. तर द्रुतगती मार्गावर ३० कि.मी.पर्यंत काम करण्यात येत होते. त्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या ट्रकना ८५ किलोमीटरवर दोन तास थांबवित आली होती.