Pune News: साताऱ्यातील माण मतदारसंघातील भाजप आमदार जयकुमार गोरे (BJP MLA Jaykumar Gore) यांच्या गाडीचा भीषण अपघात (Car Accident) झाल्याची घटना घडली आहे. पुणे-पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमीजवळ शनिवारी पहाटे पहाटे त्यांच्या गाडीचा (jaykumar gore) अपघात झाला. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात (Ruby hospital) गोरे यांना दाखल करण्यात आलंय. (bjp mla jaykumar gore health update out of danger doctor statement chandrakant patil ruby hospital pune marathi news)
पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना (jaykumar gore accident) घडली. भीषण अपघातात जखमी झालेल्या जयकुमार गोरे यांनी अपघातानंतर तात्काळ खासदार रणजितसिंह निंबाळकर (Ranjit Singh Nimbalkar) यांना फोन करुन त्यांच्याकडे मदत मागितली. रणजितसिंह निंबाळकर यांनी आमदार गोरेंना रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर ही माहिती सर्वदुर पसरली. अशातच आता त्यांच्या आरोग्याविषयीची मोठी माहिती (Jaykumar Gore Health Update) समोर आली आहे.
आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर रुबी हॉल हॉस्पिटल येथे उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी रुबी हॉल हॉस्पिटल येथे भेट देऊन आमदार गोरे यांच्या प्रकृतीविषयी (Jaykumar Gore Health Update) विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी गोरे यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली आहे.
आणखी वाचा - Jaykumar Gore : जयकुमार गोरेंचा अपघात की घातपात? वडिलांना भरून आलं, म्हणाले...
दरम्यान, चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुलावरील कठडा तोडून गाडी थेट 30 फूट खाली कोसळली. या अपघातात आणखी तीन जण जखमी असल्याची माहिती देण्यात आली होती. अपघातात जखमी झालेल्या तिघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.