आताची सर्वात मोठी बातमी! नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

संतोष परब हल्लाप्रकरणात जामीन अर्ज फेटाळला

Updated: Dec 30, 2021, 06:19 PM IST
आताची सर्वात मोठी बातमी! नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला title=

सिंधुदुर्ग BJP MLA Nitesh Rane News : भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) दाखल केलेल्या अटकपूर्व जामिन अर्जावर आज तिसऱ्या दिवशी सुनावणी झाली. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात ही सुनावणी पार पडली. संतोष परब (Santosh Parab) हल्लाप्रकरणात नितेश राणे यांचं नाव आल्यानंतर नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. पण न्यायालयाने आमदार नितेश राणे यांचा जामिन अर्ज फेटाळला आहे. 

सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता नितेश राणे यांचे वकील उद्या उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती आहे. नितेश राणे गेल्या चार दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत.

नितेश राणे यांना मोठा धक्का
त्याआधी न्यायालयाने सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीतील उमेदवार मनीश दळवी यांचाही अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे मनीष दळवी हेही बँकेच्या मतदानापासून वंचित राहिले. सरकारी वकिलांनी संतोष परब हल्ल्यात नितेश राणे यांचे पीए राकेश परब आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवार मनीष दळवी यांचा समावेश असल्याचा उल्लेख केला होता.

नितेश राणेंकडून वकिलांची फौज
नितेश राणेंकडून वकिलांची मोठी फौज उभी केली होती. सहा वकीलांनी नितेश राणेंची बाजू मांडली यात Adv संग्राम देसाई, Adv राजेंद्र रावराणे, Adv राजेश परुळेकर, Adv उमेश सावंत, Adv अविनाश परब आणि Adv प्रणिता पोटकर यांचा समावेश होता. तर सरकारतर्फे Adv प्रदीप घरत आणि Adv भूषण साळवी यांनी बाजू मांडली.

सरकारी वकिलांचा युक्तीवाद
गोट्या सावंत यांच्यावर 26 गुन्हे दाखल आहेत. धीरज जाधव, ज्ञानेश्वर माऊली, सचिन सातपुते हे तीन आरोपी आहेत या तिघांचा संबंध नितेश राणे आणि गोट्या सावंत यांच्याशी कसा आहे याचे तांत्रिक पुरावे पोलिसांकडे आहेत, असा युक्तीवाद सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. राकेश परब हा नितेश राणे यांचा खासगी PA आहे. त्याच्या  मोबाईलवरुन सचिन सातपुते याला 33 वेळा मोबाईलवरुन कॉल करण्यात आला आहे.

कायद्याची भीती सामान्य माणसाला राहिली पाहिजे. ज्याने हल्ला केला त्यांना कायद्याच धाक नाही. त्यांना इतकं निर्धास्त कोणी केलं? पकडलेले पाचही आरोपी पुण्याचे आहेत, या पाचही आरोपींचे तक्रारदाराशी काहीही संबध नाही, तसंच फिर्यादीने यापैकी कोणाचंही नाव घेतलं नाही. फक्त सिल्वर कलरच्या इनोव्हा गाडीचा उल्लेख केला या इनोवातील आरोपींचा फिर्यादीशी काहीही संबंध नाही, मग यांनी फिर्यादीवर हल्ला का केला, असा प्रश्न सरकारी वकील प्रदीप घरत यांनी उपस्थित केला.

अनोळखी माणसाने  हल्ला केला, त्यांनतर त्याने नितेश राणे आणि गोट्या सावंतच नाव घेतलं, तिथे उपस्थित असणं हे महत्त्वाचे नाही, पण कट करून हल्ला करणे हा पण गुन्हा होतो. विरोध करणाऱ्या एखाद्या माणसाला संपवण हा देखील गुन्ह्याचा भाग आहे असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील प्रदीप यांनी केला.

जबाबदार सेंट्रल मिनिस्टर पत्रकार परिषदेत सांगतात तुम्ही जर कारवाई केली तर लक्षात ठेवा केंद्रात आमचे सरकार आहे. ही धमकी नाही का? सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सवाल उपस्थित केला आहे.

काय आहे प्रकरण ?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर संतोष परब यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत आमदार नितेश राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांच्यावर हल्लाचे आरोप केले होते.