जयकुमार रावल यांना दानवेंकडून क्लीनचिट

गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी विरोधकांच्या टार्गेवर असलेले भाजपचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. पक्षश्रेष्ठींकडून त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. 

Updated: Feb 9, 2018, 07:52 PM IST
जयकुमार रावल यांना दानवेंकडून क्लीनचिट title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी विरोधकांच्या टार्गेवर असलेले भाजपचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. पक्षश्रेष्ठींकडून त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. 

कागदपत्रे सादर

धुळे जिल्ह्यात जमीन अपहार प्रकरणी जयकुमार रावल यांनी पक्षाकडे खुलासा सादर केला. जयकुमार रावल आणि रावसाहेब दानवे यांच्या अर्धा तास चर्चा झाली. दानवेंकडे कागदपत्रे सादर केली. 

‘पक्ष रावळ यांच्या पाठिशी’

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जयकुमार रावल यांना क्लीन चिट दिली आहे. राजकीय हेतूनेच रावळ यांच्यावर आरोप होत असून प्रथमदर्शी जयकुमार रावल यांनी काहीच चुकीचे केले नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे पक्ष त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभा आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले. 

काय आहे प्रकरण?

रावल यांनी 'तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनी'च्या माध्यमातून एमटीडीसीचे रिसॉर्ट बेकायदेशीर बळकावले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाव मलिक यांनी केला होता. त्यानंतर रावल यांनी हा खुलासा केला होता.

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हिल रिसॉर्ट बेकायदेशीररित्या बळकावणे आणि पर्यटन विभागाचे ४१ लाखांचे भाडेही थकल्याप्रकरणी विरोधकांचे आरोप फेटाळताना पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी हा दावा केला होता. तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीशी आपला किंवा आपल्या कुटुंबाचा कुठलाही संबंध नसल्याचा दावा ते करतायत.