आयात - निर्यात धोरण बदलूनही कांद्याच्या दरात घसरण

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आयात - निर्यात धोरणात बदल करूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 9, 2018, 04:53 PM IST
आयात - निर्यात धोरण बदलूनही कांद्याच्या दरात घसरण title=

धुळे : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आयात - निर्यात धोरणात बदल करूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. 

किती आहे कांद्याचा भाव?

किमान आधारभूत किमतीचे गाजर सरकार दाखवत असेल तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला दीड हजार ते १७०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. उन्हाळी कांदा विक्रीला आला तर या दरात अजून बदल अपेक्षित आहे. कांडा निर्यात मंदावल्याने कड्याच्या दरात घसरण झाल्याचे बोलले जात आहे. मात्र त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. 

लासलगावमध्ये झाले होते भाव कमी

३१ जानेवारीला लासलगाव बाजार समितीत कांद्याचे भाव घसरले होते. कांद्याचे भाव १ हजार २०० रुपये प्रति क्विंटलनं घरसलेत. कांद्याची आवक वाढल्यानं कांदा गडगडलाय. ३१ तारखेला बाजार समितीमध्ये कांद्याचा भाव १ हजार ९०५ तर सरासरी भाव १६०० रुपये प्रति क्विंटल इतका होता.