पुणे : भाजप आमदार प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत अर्धातास चर्चा झाली. मात्र, ही चर्चा गुप्त होती. चर्चेचा तपशिल पुढे आलेला नाही. त्यामुळे या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे ८४ तासांचे सरकार बनविण्यात प्रसाद लाड यांचा महत्वाचा वाटा होता. अजित पवार यांचे काही आमदार प्रसाद लाड यांच्या संपर्कात होते. त्यातील काहींना त्यांनी अज्ञातस्थळी हलविले होते. त्यामुळे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या प्रसाद लाड यांनी पुण्यात अजिक पवार यांची का भेट घेतली, याचीच चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार अजूनही भाजपच्या संपर्कात आहेत का, याचीही चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, लाड-पवार यांच्यातील चर्चेचा तपशिल पुढे न आल्याने चर्चा अधिकच होत आहे. प्रसाद लाड हे पुण्यात आहेत. त्याचवेळी अजित पवारही पुण्यात आहेत. त्यामुळे दोघांची भेट झाली, अशीही चर्चा आहे. अजित पवार हे आज विविध विषयांवर बैठका घेत आहेत. त्यादरम्यान प्रसाद लाड सर्किट हाऊसवर आले आणि त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. दोघे जवळजवळ अर्धा तास सोबत होते. त्यांच्यात काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेले नाही.