मुंबई : पुन्हा एकदा भाजपला निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आहे. राज्यात महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार आल्यापासून भाजपला अनेक वेळा निवडणुकीच्या रिंगणातून ऐनवेळा माघार घेण्याची नामुष्की ओढवली आहे. आता विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजन तेली यांना आपली उमेदवारी मागे घ्यावी लागली आहे. दरम्यान, आमच्याकडे संख्याबळ नसल्याने ही उमेदवारी मागे घेतली आहे, असे भाजपकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून काँग्रेसचे उमेदवार संजय दौंड विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे परळमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. तसेच ते आता मंत्रीही आहेत. त्यांच्या विधानपरिषद जागेवर ही निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी भाजपकडून कोकणातील भाजप नेते राजन तेली यांना संधी देण्यात आली होती. तर राष्ट्रवादीकडून संजय दौंड यांना उमेदवारी दिली होती. त्यानुसार या निवडणुकीसाठी विधानसभेचे आमदार मतदान करणार होते. मात्र संख्याबळ नसल्याने भाजपने माघार घेतली.
#BreakingNews
राष्ट्रवादीच्या संजय दौंड यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड... संख्याबळ नसल्यानं भाजप उमेदवार राजन तेली यांचा अर्ज मागे
https://t.co/zUoGCpBnnh pic.twitter.com/FrE7O2XJUv— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 17, 2020
संजय दौंड यांनी अनेक वर्षे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. संजय दौंड काँग्रेसमध्ये आहेत, मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना शब्द दिला होता, त्यामुळे आता त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. ते आता विधानपरिषदेचे आमदार म्हणून निवडणून आले आहेत.
- राष्ट्रवादीचे संजय दौंड विधानपरिषदेवर बिनविरोध
- धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून आल्याने रिक्त झालेल्या जागी राष्ट्रवादीचे दौंड बिनविरोध
- भाजपा उमेदवाराने घेतला अर्ज मागे
- राजन तेली यांनी भरला होता अर्ज
- या निवडणुकीसाठी विधानसभेचे आमदार करणार होते मतदान
- मात्र संख्याबळ नसल्याने भाजपाने घेतली माघार
- संजय दौंड माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र
- पंडितराव दौंड आणि शरद पवार यांचे जुने संबंध
- संजय दौंड यांनी अनेक वर्षे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केल आहे
- संजय दौंड काँग्रेसमध्ये आहेत, मात्र शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना शब्द दिला होता, त्यामुळे आता विधानपरिषदेवर संधी