Bhaskar Jadhav : शिंदे गटात येण्यासाठी 100 वेळा फोन केला; आमदार भास्कर जाधव यांच्यावर खळबळजनक आरोप

आमदार भास्कर जाधव ( MLA Bhaskar Jadhav Bhaskar ) यांच्यावर हा खळबळजनक आरोप शिंदे गटाच्या नेत्याने नाही तर भाजपच्या एका बड्या नेत्याने केला आहे. याचे पुरावे असल्याचा दावा देखील या नेत्याने केला आहे. 

Updated: Feb 27, 2023, 11:01 PM IST
Bhaskar Jadhav : शिंदे गटात येण्यासाठी 100 वेळा फोन केला; आमदार भास्कर जाधव यांच्यावर खळबळजनक आरोप title=

Maharashtra Politics:  भाजप नेते मोहित कंबोज (BJP leader Mohit Kamboj) यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Thackeray MLA Bhaskar Jadhav) यांच्यावर खळबळजनक आरोप (sensational allegations) केला आहे. भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या  गटात सामील होण्यासाठी 100 वेळा फोन केल्याचा दावा कंबोज यांनी केला आहे. भास्कर जाधव यांनी गुवाहाटीचे तिकीटही बुक केल्याचं कंबोज यांचं म्हणण आहे. 

मोहित कंबोज यांनी ट्विट करत हा खळबळजनक दावा केला आहे. भास्कर जाधव यांच्यावर विश्वास नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गटात घेण्यास इच्छुक नसल्याचा दावा देखील कंबोज यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे. 
भास्कर जाधव यांनी गुवाहाटीचे तिकीटही बुक केल्याचे ट्विट मोहित कंबोज यांनी केले आहे. जाधव हे सत्य नाकारू शकतात का? असा सवालही मोहित कंबोज यांनी ट्विट करत केला आहे (Maharashtra Politics). 

मिलिंद नार्वेकर आमदार नसतानाही सभागृहात बसले

मिलिंद नार्वेकर आमदार नसतानाही सभागृहात बसले. राज्यपालांच्या अभिभाषणासाठी संयुक्त सभागृहात नार्वेकर बसले होते. आमदार नसताना त्यांना सुरक्षा रक्षकांनी आत कसे काय सोडले ? असा प्रश्न निर्माण होतोय. यावेळी आदित्य ठाकरेंनी नार्वेकरांची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर ते उठून बाहेर गेले. प्रेक्षक गॅलरी समजून चुकून सेंट्रल हॉलमध्ये जाऊन बसलो, चूक लक्षात आल्यावर लगेच बाहेर पडलो असं स्पष्टीकरण मिलिंद नार्वेकर यांनी दिले. आदित्य ठाकरेंनीही नार्वेकर चुकून सभागृहात आल्याचं सांगितले.

उद्धव ठाकरेंचे विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या संपर्कात

उद्धव ठाकरेंचे विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर आमच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी केला आहे.नार्वेकर हे सगळ्याच पक्षांचे दुवा आहेत, ते कधीही आमच्या गटात येऊ शकतात असा दावा शिरसाटांनी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.नार्वेकर हे ठाकरेंचे विश्वासू असल्याने शिंदे गटात गेल्यास मोठा धक्का बसू शकतो.

व्हीप झुगारण्याची चूक करू नका; शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांचा इशारा

शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेना आमदारांसाठी व्हीप जारी केलाय. अधिवेशनाला सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे पक्षादेश जारी करण्यात आलेत. हा व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांनाही लागू आहे. ठाकरे गटाने हा व्हीप झुगारला तरी कोर्टाच्या आदेशानुसार दोन आठवडे कारवाई करणार नाही. पण दोन आठवड्यांनंतर कारवाईला सामोरं जावं लागेल असं गोगावले यांनी म्हटलंय. व्हीप झुगारण्याची चूक करू नका, नाही तर कारवाईला सामोरं जावं लागेल असं गोगावले यांनी सुनावलं आहे.