'दहावीत 36% तर बारावीत 2 विषयात नापास; कसंतरी रडतखडत..' महाजनांनी सांगितला स्वत:चा शैक्षणिक प्रवास

BJP Leader Girish Mahajan Education:  या दोन वर्षांमध्ये माझी अनेक खाती बदलली.म्हणजे इन्कमिंग वाढलं की खात बदललं जातं, असे महाजन म्हणाले.

Pravin Dabholkar | Updated: Jul 26, 2024, 02:06 PM IST
'दहावीत 36% तर बारावीत 2 विषयात नापास; कसंतरी रडतखडत..' महाजनांनी सांगितला स्वत:चा शैक्षणिक प्रवास title=
गिरीश महाजनांचा शैक्षणिक प्रवास

BJP Leader Girish Mahajan Education:  'संकटमोचक' अशी ओळख असलेले भाजपचे नेते आपल्या दिलखुलास वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नुकतेच त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान स्वत:च्या शिक्षणाविषयी माहिती दिली. सध्याच्या परीक्षा आणि परीक्षा व्यवस्था याबद्दल ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी दहावी, बारावीला किती गुण मिळाले? याची माहिती दिली.कोणत्याही पदासाठी परीक्षा घेणं पहिल्या इतकं सोपं राहिलेलं नाही. आता परीक्षांमध्ये आता खूप गडबडी व्हायला लागली आहे. परीक्षा घेणं ताप झालेला आहे. आता युपीएससी परीक्षांमध्येसुद्धा आता घोळ होत असल्याचे समोर येत आहे.या परीक्षासुद्धा आता क्रॅक व्हायला लागल्याचे महाजन म्हणाले. मोबाईलमुळे हा सर्व ताप झालाय. मोबाईलवरून कोणी प्रश्नपत्रिका बाहेर पाठवतो, कोणी बाहेरून उत्तरपत्रिका आतमध्ये पाठवतो. अशा पद्धतीने सगळ्या गडबडी होत असल्याचे ते म्हणाले. 

एकतर नोकऱ्या निघत नाहीत. निघाल्या तर मग आमच्याकडे नुसतं 19 हजार जागांसाठी12 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. 12 लाख विद्यार्थ्यांना परीक्षेला कसं काय बोलावायचं हे कळत नाही.एवढ्या लोकांचे पैसे घेताना तिथे व्यवस्था करताना आमचे इतक्याला नाकी नऊ आल्याचे त्यांनी सांगितले. 

नोकरी न लागल्याचं दु:ख

माझे वडीलसुद्धा शिक्षक होते. तरीही मी अभ्यासामध्ये खूप मागे होतो.पण खेळात पुढे होतो.हे सोडून नोकरी लागले पाहिजे अशी वडिलांची इच्छा होती पण माझा ट्रॅक चुकला. मला दहावीत 36 टक्के , 12 वीत मी 2 विषयात नापास झालो..अस कसंतरी रडतखडत पदवीचे शिक्षण पूर्ण केलं..मात्र नोकरी लागली नाही त्याच दुःख मला आजही असल्याचे त्यांनी सांगितले. पण आज मी वैद्यकीय मंत्री म्हणून बाहेरील देशामधील तज्ञ डॉक्टरांना मार्गदर्शन केलं.अशी गमतीशीर लोकशाही असल्याचे त्यांनी सांगितले. 

आमची दर 5 वर्षांनी परीक्षा

विधानसभेत मी सिनियर आमदार आहे. आम्हाला दर पाच वर्षांनी परीक्षा द्यावी लागते. त्यासाठी खूप अभ्यासपण करावा लागतो. तुम्ही 10 काम करा पण एक काम केलं नाही तर कार्यकर्ते पक्ष बदलतात. आता पूर्वीसारखे राहिले नाही. खूप प्रॉब्लेम झाला आहे. आता इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे..
कार्यकर्ते पक्ष बदलतात मित्रसुद्धा आता इकडून तिकडे जातात. त्यामुळे आम्हाला सुद्धा 5 वर्ष खूप मेहनत घ्यावी लागते.कार्यकर्त्यांना खूप सांभाळावं लागतं.आणि आम्ही आमच्या परीक्षेमध्ये नापास झालो तर डायरेक्ट घरी.. असेही ते म्हणाले. 

इन्कमिंग वाढलं की माझं खात बदललं जातं

मी सहा वेळा तर गुलाबराव चार वेळा मंत्री झालो.अनिल पाटील पहिल्यांदा मंत्री झाले. याप्रमाणे खूप परिश्रम करावे लागतात.पण आम्हाला सध्या कुणी कंटाळलेले नाही. या दोन वर्षांमध्ये माझी अनेक खाती बदलली.म्हणजे इन्कमिंग वाढलं की खात बदललं जातं. माझ्याकडे 3-4 विभाग होते. त्यानंतर पुन्हा सरकार आले आणि खाती बदलली. मग अजित दादा आले..माझे वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा खात तिकडे गेल्याचे ते म्हणाले. आता नवीन पर्यटन आणि ग्रामविकास हे मोठं खात आलं पण जे खात मिळालं.ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचे ते म्हणाले.