भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या बॅनरवरून भाजप नेते गायब, खडसेंना स्थान

भाजपचे (BJP) भुसावळचे आमदार (Bhusawal MLA ) संजय सावकारे ( Sanjay Saavkare) यांच्या बॅनरवरून ( banner) भाजप नेते (BJP leader)गायब झाल्याचे दिसून येत आहे. 

Updated: Dec 12, 2020, 07:32 AM IST
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या बॅनरवरून भाजप नेते गायब, खडसेंना स्थान title=

वाल्मिक जोशी / जळगाव : भाजपचे (BJP) भुसावळचे आमदार (Bhusawal MLA ) संजय सावकारे ( Sanjay Saavkare) यांच्या बॅनरवरून ( banner) भाजप नेते (BJP leader)गायब झाल्याचे दिसून येत आहे. हे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या बॅनरवर केवळ एकनाथ खडसे  (Eknath Khadse) यांचा फोटो दिसत आहे. या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांचे खंदे समर्थक मानले जातात. परंतु एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का असा प्रश्न निर्माण होत असताना काल त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या बॅनरवर भाजपच्या कुठल्याही नेत्याचा फोटो न लावता फक्त एकनाथ खडसे यांचा फोटो लावल्याचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

खान्देशातील मोठे नेते म्हणून ओळख असलेले एकनाथ खडसे यांनी आपल्या हातावर घड्याळ बांधले. असल्यामुळे भविष्यात अनेक उलथापालथी होतील याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक समर्थकांनी राष्ट्रवादी प्रवेश केला, तर काहींनी पक्षांतराच्या अडचणी येऊ नये म्हणून टर्म झाल्यानंतर त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

अशातच खडसेंचे खान्देश समर्थक म्हणून ओळख असलेल्या भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी व त्यांच्या समर्थकांनी वाढदिवसाच्या दिवशी आपण लवकरच एकनाथ खडसे यांच्यासोबत जाणार किंवा त्यांच्यासोबत आहोत, याचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे. त्यांनी दिलेल्या जाहिरातींमध्ये किंवा वृत्तपत्रातील जाहिरातीमध्ये कुठेही गिरीश महाजन किंवा भाजपच्या मोठ्या नेत्यांचे छायाचित्र दिसत नाही, त्यामुळे जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.