मुंबई : Narayan Rane on Shiv Sena Minister Eknath Shinde Notreciable : विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर अनेक आमदार नॉट रिचेबल आहेत. नॉट रिचेबल असणारे आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरत येथील हॉटेलवर असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नॉट रिचेबल एकनाथ शिंदे यांच्यावर नारायण राणे यांचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याचे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही म्हटले आहे. मात्र ते कुठे आहेत असं कधी सांगायचं असतं का, असा सवाल त्यांनी विचारला. अशा गोष्टीवर कोणतेही भाष्य करु नये. अन्यथा त्याला काहीही अर्थ उरत नाही, असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे सूरतमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे. सूरतच्या द ग्रँड भगवती हॉटेलमध्ये काही आमदारांची बैठक झाली. धक्कादायक बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासह द ग्रँड भगवतीमध्ये शिवसेनेचे 17 आमदार असल्याची माहिती आहे. हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांची बैठक झाल्याची माहिती सूत्रांची आहे. दरम्यान, शिवसेना नाराज आमदार आणि शिंदे नॉट रिचेबल असल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा संपर्क करण्यात आला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाकडून आपआपल्या आमदारांना संपर्क तात्काळ सुरु केला आहे.
विधानपरिषद निकालानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिवसेना फुटीच्या उंभरठ्यावर उभी आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे. एकनाथ शिंदे काल सायंकाळपासून नॉट रिचेबल आहेत. कालच्या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेची 11 मते फुटली आहेत. शिंदे गुजरातच्या सूरतमधील ग्रॅंड भगवती हॉटेलमध्ये असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
Maharashtra | No comments should be made on such things, else what is the point of being unreachable: Union Minister & BJP leader Narayan Rane on Maharashtra minister & Shiv Sena leader Eknath Shinde who is reportedly "unreachable" pic.twitter.com/M2x08Co6Uf
— ANI (@ANI) June 21, 2022
अब्दुल सत्तार
संभूराजे देसाई
तानाजी सावंत
चंद्रकांत पाटील (अपक्ष)
संजय राठोड
प्रताप सरनाईक
राजन साळवी
योगेश कदम
प्रकाश सुर्वे