मोठी बातमी । विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस 'नॉट रिचेबल'

Maharashtra Political Crisis : मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मोठ्या बंडानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आहे. भाजपने वेगळी रणनिती आखली आहे.

Updated: Jun 23, 2022, 07:58 AM IST
मोठी बातमी । विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस 'नॉट रिचेबल' title=

मुंबई : Maharashtra Political Crisis : मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मोठ्या बंडानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आहे. भाजपने वेगळी रणनिती आखली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमरांची बैठक बोलावली आहे. त्याचवेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस मीडियासाठी 'नॉट रिचेबल' असणार आहेत.सत्तेचा नवा प्रयोग यशस्वी करण्याची रणनीती आणखण्यात येत आहे. त्यामुळे फडणवीसांचा सागर बंगला गोपनीय हालचालींचं केंद्र बिंदु ठरला आहे.

सरकारमधील हालचालींबाबत फडणवीसांचा सावध पवित्रा

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या मीडियासाठी ‘नॉट रिचेबल’ असले तरी सत्तेचा नवा प्रयोग यशस्वी करण्यासाठी रणनीती आखत आहेत अशी माहिती मिळत आहे. अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांना सोबत घेत सत्तेच्या अध्यायाचे एकेक पान तयार करीत आहेत. मलबार हिलवर समुद्राला लागून फडणवीस यांचा सागर हा बंगला सध्या गोपनीय हालचालींचे केंद्र बनला आहे.

सत्तेची स्क्रिप्ट ते लिहीत आहेत. राज्यसभा, विधान परिषदेतील विजयानंतर मुख्यमंत्रीपदावर त्यांची नजर आहे. फडणवीस-अजित पवार प्रयोग फसला. राजस्थानमध्येही आपटी खावी लागली. त्याची पुनरावृत्ती होऊ नये हे बघितले जात आहे. नियोजन त्यांनी खूप आधीपासून केलेले होते...पण कुठेही त्याची वाच्यता न करण्याचे भान त्यांनी बाळगले आहे.