धुळे : शिंदखेडा नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा पडकला आहे. १७ पैकी ९ जिंकत भाजपने आपली सत्ता काबीज केली आहे.
या निवडणुकीत काँग्रेसला ६ जागा मिळाल्या असून समाजवादी पार्टीला दोन जागा मिळाल्या आहेत.
भाजप - ०९ जागा
काँग्रेस - ०६ जागा
समाजवादी पार्टी - ०२ जागा
दरम्यान, या निवडणुकीत नगराध्यक्षपदी भाजपच्या रजनी अनिल वानखेडे तीन हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी झाल्या आहेत. पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी या पालिकेवर सत्ता मिळविण्यात मोलाचा वाटा उचलाय.