पुणे मेट्रोचा नवा वाढीव मार्ग... पिंपरी ते कात्रज!

पुण्यातील नियोजित पिंपरी ते स्वारगेट मेट्रो आता कात्रजपर्यंत धावणार आहे. पुणे महापालिकेनं त्यासाठी तयारी सुरु केली आहे. 

Updated: Dec 13, 2017, 11:39 PM IST
पुणे मेट्रोचा नवा वाढीव मार्ग... पिंपरी ते कात्रज! title=

पुणे : पुण्यातील नियोजित पिंपरी ते स्वारगेट मेट्रो आता कात्रजपर्यंत धावणार आहे. पुणे महापालिकेनं त्यासाठी तयारी सुरु केली आहे. 

स्वारगेट ते कात्रज या वाढीव मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवार म्हणजेच डीपीआर लवकरच बनवला जाणार आहे. त्यासाठी महापालिका तीस लाख रुपये देणार आहे. 

या मार्गाच्या उभारणीसाठी येणाऱ्या खर्चातील काही हिस्सा महापालिकेला द्यावा लागणार आहे. त्यासाठी तीन वर्षात तीनशे कोटी रुपये देण्याची महापालिकेची तयारी आहे. महामेट्रोनेही या मार्गाला होकार दिलाय. पुण्यात मेट्रोच्या दोन मार्गाचं काम सुरु झालंय. 

पिंपरी ते स्वारगेट आणि कोथरूड ते रामवाडी असे हे दोन मार्ग आहेत. यातील पिंपरी - स्वारगेट मार्ग पुण्यात कात्रजपर्यंत वाढणार आहे.

तर, पिंपरी -चिंचवड महापालिकेनं मंजुरी दिल्यानं तिथंही हा मार्ग निगडीपर्यंत वाढणार आहे. त्यामुळं मेट्रोचा हा मार्ग निगडी ते कात्रज असा होणार आहे.