मोठी बातमी| सोलापूरमध्ये भूकंपाचे धक्के

हे धक्के सौम्य असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. भूकंपाचं केंद्र कर्नाटकातील विजयपूर असल्याचं सांगितलं जात आहे. 

Updated: Jul 9, 2022, 12:16 PM IST
मोठी बातमी| सोलापूरमध्ये भूकंपाचे धक्के title=

सचिन कसबे, झी 24 तास, मंगळवेढा : आता एक धक्कादायक बातमी आहे. एकीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ सुरू आहे. तर दुसरीकडे  मंगळवेढा तालुक्यातील काही गावासह भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे. 

हे धक्के सौम्य असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. भूकंपाचं केंद्र कर्नाटकातील विजयपूर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील गावात भूकंप धक्का जाणवला आहे. 

भूकंपाचे धक्के बसल्याने काहीसं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्याने काहीशी खळबळ उडाली आहे.