Big Breaking : विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट; महाराष्ट्र सरकारचा अत्यंत महत्वाचा निर्णय

विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगरे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी सांभाळणार आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Aug 17, 2024, 06:46 PM IST
 Big Breaking : विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट; महाराष्ट्र सरकारचा अत्यंत महत्वाचा निर्णय title=

maharashtra vidhan sabha election 2024 : विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर 6  अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने  मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 36 विधानसभा मतदारसंघांसाठी मिळून एकूण सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. 
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील संपूर्ण क्षेत्र लक्षात घेतले तर ते मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा या दोन महसूल क्षेत्रात मोडते. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा हे दोन जिल्हे मिळून म्हणजेच मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. 

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय कामकाजाला वेग आला असताना, माननीय भारतीय निवडणूक आयोगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.  त्याचप्रमाणे आता, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मदतीला एकूण सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. 

यामध्ये मुंबई महानगरपालिकेतील चार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त तसेच मुंबई शहर जिल्हाधिकारी व मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी अशा सहा जणांचा समावेश आहे. या संदर्भातील आदेश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने निर्गमित करण्यात आले आहेत. निवडणूक विषयक कामकाज सुनियोजित आणि सुलभ व्हावे, तसेच सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राहावे, या दृष्टीने या सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. 

1 अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हाधिकारी

(विद्यमान जिल्हाधिकारी - श्री. संजय यादव)

(महसूल क्षेत्र - मुंबई शहर जिल्हा)

(लोकसभा मतदार संघ - दक्षिण मुंबई)

विधानसभा मतदारसंघ - वरळी (182), शिवडी (183 ), भायखळा (184), मलबार हिल (185), मुंबादेवी (186), कुलाबा (187)

2 अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर)

(विद्यमान अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी)

(महसूल क्षेत्र- मुंबई शहर जिल्हा)

(लोकसभा मतदार संघ - दक्षिण मध्य मुंबई)

विधानसभा मतदारसंघ - धारावी (178), शीव कोळीवाडा (179), वडाळा (180), माहीम (181)

3 अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे)

(विद्यमान अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी)

(महसूल क्षेत्र- मुंबई उपनगरे जिल्हा)

(लोकसभा मतदारसंघ - दक्षिण मध्य मुंबई)

विधानसभा मतदारसंघ - अणुशक्ती नगर (172), चेंबूर (173)

लोकसभा मतदारसंघ - मुंबई उत्तर पूर्व

विधानसभा मतदारसंघ- मुलुंड (155), विक्रोळी (156), भांडूप पश्चिम (157), घाटकोपर पश्चिम (196), घाटकोपर पूर्व (170), मानखुर्द शिवाजी नगर (171)

4 अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी

(विद्यमान जिल्हाधिकारी - श्री. राजेंद्र क्षीरसागर)

(महसूल क्षेत्र- मुंबई उपनगरे जिल्हा)

(लोकसभा मतदारसंघ- उत्तर मध्य मुंबई)

विधानसभा मतदारसंघ - विलेपार्ले (167), चांदिवली (168), कुर्ला (174), कलिना (175), वांद्रे पूर्व (176), वांद्रे पश्चिम (177)

5 अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे)

(महसूल क्षेत्र- मुंबई उपनगरे जिल्हा)

(लोकसभा मतदारसंघ - उत्तर पश्चिम मुंबई)

विधानसभा मतदारसंघ- जोगेश्वरी (158), दिंडोशी (159), गोरेगाव (163), वेसावे (वर्सोवा) (164), अंधेरी पश्चिम (165), अंधेरी पूर्व (166)

6 अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)

(विद्यमान अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर)

(महसूल क्षेत्र - मुंबई उपनगरे जिल्हा)

(लोकसभा मतदारसंघ - उत्तर मुंबई)

विधानसभा मतदारसंघ - बोरिवली (152), दहिसर (153), मागाठाणे (154), कांदिवली पूर्व (160), चारकोप (161), मालाड पश्चिम (162)