SSC Result 2022 : दहावीचा निकाल जाहीर; झी 24 तासवर सर्वात आधी पाहा Result

घाई न करता वाचा कुठे आणि कसा पाहाल निकाल. 

Updated: Jun 17, 2022, 11:32 AM IST
SSC Result 2022 : दहावीचा निकाल जाहीर; झी 24 तासवर सर्वात आधी पाहा Result  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता मागोमागच इयत्ता 10 वी परीक्षांचे निकालही जाहीर झाले आहेत. शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करण्यात आला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा घेण्यात आल्याचं सांगत शिक्षण मंडळांकडून सुरुवातीला काही मुद्दे स्पष्ट करुन सांगण्यात आले. (big breaking 10 th SSC Result 2022 declared website time cut off)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) मार्च-एप्रिल 2022  या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल online आज दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहेत. 

नऊ विभागीय मंडळातून 15 लाखांहून अधिक नियमित विद्यार्थ्यांनी या परिक्षेसाठी नोंदणी केली होती. एकूण 96.94 टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. यंदाच्या परीक्षांमध्ये कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला. तर मुलींनी यंदाही बाजी मारली. मार्च 2020 च्या तुलनेत 2022 चा निकाल 1. 64 % ने वाढला

 

एकूण परीक्षार्थी : 15 लाख 68 हजार
विद्यार्थी : 15 लाख 21 हजार 3
उत्तीर्णतेची टक्केवारी : 96.94
विद्यार्थी : 96.06
विद्यार्थिनी : 97.96

महत्त्वाची आकडेवारी 

विभागनिहाय निकाल
पुणे : 96.96 %
मुंबई : 96 94 %
कोकण : 99.27 ( सर्वाधिक)
अमरावती : 96.81 %
नागपूर : 97.00 %
औरंगाबाद : 96.33 %
कोल्हापूर : 98.50 %
नाशिक : 95.90 % ( सर्वात कमी)
लातूर : 97.27 %

प्रावीण्य श्रेणी : 650779

प्रथम श्रेणी : 570027
द्वितीय श्रेणी : 258027
उत्तीर्ण श्रेणी : 42170

100 टक्के निकालाच्या शाळा : 12210

कुठे पाहता येणार निकाल? 

http://mahresult.nic.in 
http://sscresult.mkcl.org 
https://ssc.mahresults.org.in 

या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. 

गुण पडताळणीसाठी 20 जून ते 29 दरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.