उल्हासनगरमध्ये इमारतीमध्ये घुसलेला बिबट्या जेरबंद

उल्हासनगरसारख्या गजबजलेल्या शहरात  बिबटया  आल्यानं शहरात एकच खळबळ उडाली होती. अखेर सहा तासांनंतर बिबटयाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं.

Updated: Mar 19, 2018, 09:48 AM IST
उल्हासनगरमध्ये इमारतीमध्ये घुसलेला बिबट्या जेरबंद title=
चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : उल्हासनगरसारख्या गजबजलेल्या शहरात  बिबटया  आल्यानं शहरात एकच खळबळ उडाली होती. अखेर सहा तासांनंतर बिबटयाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं.
 
गुढीपाडव्याचा दिवस.. सकाळची आठची वेळ.. उल्हासनगर शहरातील्या कॅम्प नंबर पाचच्या भाटिया चौक परिसरात अचाकन बिबट्या दिसला... सुरेश असरानी यांच्या बंगल्यात हा बिबट्या घुसला.. बिबट्याचा हा मुक्त वावर सीसीटीव्हीत कैद झाला..
 
बिबट्या आल्याची बातमी शहरात वा-यासारखी परसली आणि बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.. पोलीस, अग्निशमनदलाला माहिती मिळताच ते तातडीनं घटनास्थळी दाखल झाले.. असरानी कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं.. वनविभागाच्या विशेष पथकाला पाचारण करण्यात आलं.. या पथकानं दोन तासांत बंगल्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याला बेशुद्ध करत जेरबंद केले. 
 
या बिबट्याच्या प्रकृतीची तपासणी करुन त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आलंय. मात्र उल्हासनगरसारख्या काँक्रिटच्या जंगलात बिबट्या कुठून आणि कसा आला याचं कोडं मात्र उलगडलं नाही..