भिवंडी : लग्नाच्या हळदी कार्यक्रमात बेधुंद नाचताना रोखल्याचा राग म्हणून चार जणांच्या टोळक्यानं, दोघांना बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यामधल्या काल्हेर इथली ही घटना आहे. या जीवघेण्या मारहाणीचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. २४ एप्रिलला प्रितम प्रताप पाटील याचा भाऊ साहिल याच्या हळदीच्या कार्यक्रमात चारजणांचं हे टोळक नाचत होतं. त्यांच्या बेदरकार नाचण्यानं हळदीच्या कार्यक्रमाचा बेरंग होऊ लागला. म्हणून प्रितम आणि त्याचा चुलत भाऊ कुमार या दोघांनी या चौघांना हळदीत नाचायला मनाई केली.
चारचौघात आपला अपमान झाल्याचा राग मनात धरुन, या टोळक्यानं प्रितम आणि कुमार यांना मारहाण केली. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार टोळक्याचा शोध पोलीस घेत आहेत.