पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगडे याच्यावरच्या हल्लेखोराची रेखाचित्रं सीआयडीनं प्रसिद्ध केली आहेत. या आरोपींची माहिती देणाऱ्यांना योग्य बक्षीस देणार असल्याचंही सीआयडीनं जाहीर केलं आहे.
१ जानेवारीला कोरेगाव भीमा गावातल्या भीमा कोरेगावच्या ऎतिहासिक लढाईच्या द्विशतक पूर्तीनमित्त भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंची गर्दी जमली असताना दंगल उसळली. काही समाजकंटकांनी जोरदार दगडफेक सुरू केली. नेमका त्याचवेळी काही कामानिमित्त रस्त्यावर आलेल्या याच गावातील राहुल फटांगडे या तरुणाला राहुलला दगड लागले. त्यात कोणत्याही गटाचा भाग नसलेल्या राहुलचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. भीमा कोरेगाव प्रकरणा मागे पुण्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी तीन ते चार दिवस आधी चिथावणी दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.