पुणे : भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्तानं पुण्यातील शनिवारवाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावरून नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत.
१ जानेवारी १८१८ ला पुण्याजवळ भीमा कोरेगावात झालेल्या ऐतिहासिक लढाईत महार सैनिकांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला होता. दलित संघटनांतर्फे हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो.
दरवर्षी प्रमाणे यंदाही भीमा कोरेगाव मध्ये कार्यक्रम होणार आहे. मात्र या घटनेला २०० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं काही संघटनांनी पुण्यातील शनिवार वाड्यावर कार्यक्रमाचं आयोजन केलय. लोकशासन आंदोलन, संभाजी ब्रिगेड, कबीर कला मंच यांसह सुमारे ४० संघटना त्यात सहभागी आहेत.
हा कार्यक्रम म्हणजे नव्या पेशवाईच्या विरोधातील एल्गार परिषद असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला पेशव्यांचे वंशज तसेच ब्राह्माण संघटनांनी शनिवार वाड्यावर हा कार्यक्रम होण्यास विरोध दर्शवलाय.