ठाणे : भाजच्या एकाधिकारशाहीमुळे देशाची संसदीय लोकशाही आणि संविधानालाच धोका निर्माण झाला आहे. हा धोका टाळण्यासाठी अवघा महाराष्ट्र भाजपमुक्त करू, असे विधान गुजरातमधील नवनिर्वाचीत आमदार व ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे आमदार जितेंद्र आव्हा यांनी पासबन-इ-अदब मुशायरा कमिटी यांच्या वतीने 'मुशायरा 2017'चे आयोजन केले होते. हा कार्यक्रम मुंब्रा येथील मित्तल ग्राऊंड येथे पार पडला. या मुशायऱ्याच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या वेळी बोलताना ठाकोर यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी अराजकता माजली असल्याचा आरोप केला. तसेच, दलित, अल्पसंख्याक वर्ग प्रचंड दहशतीखाली वावरत आहे. भारतीय संविधानाची पायमल्ली होत असून, ते धोक्यात आले आहे. मर्यादीत लोकांचे हित साधण्यासाठी संपूर्ण जनतेला वेटीस धरले जाण्याचा प्रकार सुरू आहे, असेही अल्पेश ठाकोर या वेळी म्हणाले.
'या देशात बोकाळलेला भ्रष्टाचार कायम आहे. मात्र, या भ्रष्टाचाराविरोधात मोकळा गळा काढत थापेबाजी करून भाजपने सत्ता मिळवली. ही थापेबाजी अजूनही थांबली नसून, भाजप त्याला खतपाणीच घालत आहे. मात्र, जनता हुशार असते ती एकदाच फसते. पुन्हा पुन्हा फसत नाही. सरकारची ही थापेबाजी आम्ही उघड करू', असा इशाराही ठाकोर यांनी या वेळी दिला.