भिंवडी इमारत दुर्घटना : ३ ठार, मालकाला अटक

भिंवडींच्या इमारत दुर्घटनेतल्या मृत्यांच्या संख्येत वाढ झालीय. मृतांचा आकडा तीनवर पोहोचलाय. तसंच इमारतीचा मालक ताहीर अन्सारी याला पोलिसांनी अटक केलीय. 

Updated: Nov 24, 2017, 09:07 PM IST
 भिंवडी इमारत दुर्घटना : ३ ठार, मालकाला अटक title=

ठाणे : भिंवडींच्या इमारत दुर्घटनेतल्या मृत्यांच्या संख्येत वाढ झालीय. मृतांचा आकडा तीनवर पोहोचलाय. तसंच इमारतीचा मालक ताहीर अन्सारी याला पोलिसांनी अटक केलीय. 

मदत कार्यादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांना आणखी दोन मृतदेह सापडले आहेत. ढिगाऱ्याखाली १२ ते १५ जण अडकल्याचा संशय व्यक्त होतेय. त्यामुळं मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. 

भिवंडीच्या नवी वस्ती भागात चार मजली इमारत कोसळली.  इमारत अवघी १० ते १२ वर्ष जुनी असल्याचं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. इमारतीत अनेक कुटूंब राहत होती.