माझी उमेदवारी 100 टक्के...; महायुतीच्या जाहिरातीतून फोटो गायब झाल्यानंतर भावना गवळींचे सूचक वक्तव्य

PM Narendra Modi Yavatmal Visit: महायुतीने प्रधानमंत्री यांच्या स्वागतासाठी वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीत भावना गवळी यांचा फोटो नसल्याने त्यांच्या उमेदवारीवर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत.  

Updated: Feb 28, 2024, 12:56 PM IST
माझी उमेदवारी 100 टक्के...; महायुतीच्या जाहिरातीतून फोटो गायब झाल्यानंतर भावना गवळींचे सूचक वक्तव्य title=
Bhavna Gawli Photo missing from Mahayuti advertisement ahed of PM Narendra Modi Yavatmal Visit

PM Narendra Modi Yavatmal Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. यवतमाळ येथे त्यांची सभा होणार आहे. पंतप्रधानांच्या सभेसाठी महायुतीने जोरदार तयारी केली आहे. मात्र, या सभेपूर्वी झालेल्या जाहिरातींमध्ये यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांचा फोटो नसल्याचे चर्चेचा उधाण आले आहे. लोकसभा निवडणूक 2024 तोंडावर आली असताना भावना गवळी यांच्या उमेदवारीवरुन संभ्रामाचे वातावरण आहे.  मात्र, या सगळ्या प्रकरणावर खासदार भावना गवळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

भावना गवळी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. जाहिरात पोस्टरवर माझा फोटो नसला तरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो असल्याचा आनंद आहे, ते यवतमाळ मध्ये येत आहेत हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे आणि माझी उमेदवारी देखील 100 टक्के पक्की आहे अशी प्रतिक्रिया खासदार भावना गवळी यांनी दिली आहे. 

नेमकं प्रकरण काय?

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी या पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी लावलेल्या पोस्टर व महायुतीच्या आमदारांनी वृत्तपत्रांना दिलेल्या जाहीरातीमुळे पुन्हा चर्चेत आल्या आहे आहेत. पालकमंत्री व महायुतीच्या आमदारांनी दिलेल्या जाहिरातीत भावना गवळी यांचा फोटोच नाहीये. त्यांच्या नावाचाही उल्लेख नाही त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवरून पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत, तर गवळी यांनी शहरात लावलेल्या बॅनरवर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच फोटो असून शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोटो नाही. त्यावरूनही राजकीय चर्चेला जोर आला आहे.

संजय राठोड यांची प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदींच्या सभास्थानी आमदार संजय राठोड सक्रीय असताना खासदार भावना गवळी यांच्याबाबत मात्र फारशी चर्चा होताना दिसत नाहीये. मात्र, या सगळ्या प्रकरणावर संजय राठोड यांनी मत व्यक्त केले आहे. सभा यशस्वी करणे सोबतच आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार निवडून आणणे ह्यासाठीच झटत आहे, असं राठोड म्हणाले आहेत. तसंच, भावना गवळी यांचा फोटो नसलेली जाहिरात कोणी दिली, याबाबत मात्र त्यांनी बोलणे टाळले. 

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात उमेदवारी कुणाला मिळेल हे अद्याप निश्चित झालेले नाही, मात्र वरिष्ठ नेते जो उमेदवार देतील त्याला विजयी करू, असं संजय राठोड यांनी म्हटलं आहे. 

पंतप्रधान मोदींचा दौरा कसा असेल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत. बचत गटांच्या महिला मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार असून दुपारी साडे चार ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्यांचे कार्यक्रम आहेत. पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी यवतमाळ शहरालगतच्या विमानतळाजवळ 45 एकर जागेवर भव्य मंडप उभारण्यात आला आहे.