प्रविण दांडेकर / भंडारा : Wedding dance Video viral : आदिवासी लोकनृत्यावर वधु-वरांचा भन्नाट डान्स सध्या चर्चेचा विषय झाला आहे. या व्हिडिओ सुद्धा भंडाऱ्यात जिल्ह्यात प्रचंड वायरल होत आहे. आपली पारंपारिक संस्कृती जपणाऱ्या वधु-वारांच्या लोकनृत्याला नेटकऱ्यांनी चांगलेच डोक्यावर घेतल्याचे दिसत आहे.
दरम्यान या व्हिडिओ वर कौतुकांचा वर्षाव पाहायला मिळत आहे. बहुतांश आदिवासी भाग म्हणून भंडारा गोंदिया जिल्हाची ओळख आहे. बहुतांश डोंगराळ आणि घनदाट जंगलाने व्यापलेल्या या आदिवासी ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात आदिवासी जमातीचे लोक वास्तव्य करतात. दिवसेंदिवस पाश्चिमात्य संस्कृतीने लग्न कार्य आणि आपल्या पारंपारिक संस्कृतीवर प्रभाव पडलेला आहे.
आजची तरुण पिढी परंपरा आणि संस्कृतीला विसरत चालत असतांना एका लग्न सोहळ्यात वधु-वरांनी आदिवासी लोकनृत्यात लोकप्रिय असलेल्या रेला रे लोकगीतावर भन्नाट नृत्य करीत पाहुण्यांचे आणि आदिवासी भागातील लोकांचे लक्ष वेधले आहे. सध्या हा व्हिडिओ भंडारा, जिल्हात चांगलाच वायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे.