मोठी बातमी : पेपरफुटी प्रकरणात जिल्हा परिषदेचा शिक्षक अटकेत

Health group c paper leak case : आरोग्य गट क पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळेतून आणखी एका शिक्षकाला अटक करण्यात आली.

Updated: Jan 6, 2022, 02:42 PM IST
मोठी बातमी : पेपरफुटी प्रकरणात जिल्हा परिषदेचा शिक्षक अटकेत title=
संग्रहित छाया

बीड : Health group c paper leak case : आरोग्य गट क पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळेतून आणखी एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर सेलने ही कारवाई केली आहे. (Beed Zilla Parishad teacher arrested in paper leak case)

पेपरफुटी प्रकरणात बीड जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाला अटक केली. शिक्षकाला शाळेतूनच ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. अटक केलेल्या शिक्षकाचे नाव उद्धव प्रल्हाद नागरगोजे आहे. बीड जिल्ह्यातून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
 
शिक्षक उध्दव प्रल्हाद नागरगोजे आला अटक करण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. गेल्या 15 दिवसांपासून पुण्याचं पथक बीडमध्ये या शिक्षकाचा शोध घेत होते. शिरूर तालुक्यातील तितरवणीतून शिक्षक उध्दव प्रल्हाद नागरगोजेला अटक झाली. 

बीड जिल्ह्यातील उध्दव प्रल्हाद नागरगोजे , प्रशांत व्यंकट बडगीर, डॉ.संदीप त्रिंबकराव जोगदंड, शाम महादू मस्के, नामदेव विक्रम करांडे इतक्या आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. वेगवेगळे अधिकाऱी आणि परीक्षा घेणाऱ्या आयटी कंपन्यांमधील काही लोकांना हाताशी धरून आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात यांचा सहभाग होता.