काळजी घ्या! विदर्भात पुढचे 2 दिवस Heat wave अलर्ट

मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर पण विदर्भात सूर्यदेवाचा प्रकोप, पुढचे दोन दिवस IMD चा अलर्ट

Updated: Jun 3, 2022, 08:34 PM IST
काळजी घ्या! विदर्भात पुढचे 2 दिवस Heat wave अलर्ट title=

नागपूर : महाराष्ट्राच्या वेशीवर मान्सून असताना दोन ते तीन जिल्ह्यात मात्र अजूनही सूर्य आग ओकत आहे. पुढचे दोन दिवस काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून हा अलर्ट देण्यात आला आहे. 

नागपुरात आज या मोसमातला सर्वात उष्ण दिवस असल्याची नोंद करण्यात आली. नागपुरात 46.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आज करण्यात आली. तर चंद्रपूरमध्ये 46.4 अंश तर वर्ध्यातही 45.2 अंश सेल्सियस तापमान पोहोचलं होतं. 

पूर्व विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने केला जारी केला आहे. नागपूर ,वर्धा ,चंद्रपूर आणि गोंदियामध्ये पुढील दोन दिवसाचा उष्णतेचा तडाखा राहणार आहे. जूनच्या पहिल्या टप्प्यात सूर्यनारायणाने विदर्भाला होरपळल्याचं पाहायला मिळालं.