ठाणे : बदलापुरात बुंदीच्या लाडूत अळ्या आढळून आल्या आहेत. बदलापूर पूर्वेतील कात्रप परिसरातली ही घटना आहे. मधुरम स्वीट्स नावाच्या दुकानातले हे लाडू आहेत. वांगणीचे किरण मेढेकर यांनी मधुरम स्वीट्स दुकानातून हे लाडू घेतले होते. या घटनेमुळे बदलापूर परिसरात नाराजी निर्माण झाली.
ऐन गणेशोत्सवाच्या काळात बदलापुरात बुंदीच्या लाडूत अळ्या आढळल्याने एकच खळबळ उडालीय. बदलापूर पूर्वेतील कात्रप परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय. वांगणीच्या किरण मेढेकर यांनी बदलापुरातील मधुरम स्वीट्स दुकानातून घेतलेल्या लाडूत अळ्या सापडल्यात. यावेळी किरण यांनी या दुकानाचा कारखाना पाहिला असता तिथेही प्रचंड अस्वछ दिसून आली. तर किरण यांनीच आपल्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप दुकानदार रमेश त्रिवेदी यांनी केलाय.
दोन आठवड्यांपूर्वी अंबरनाथमधील बबन वडापावच्या दुकानातील वडापावमध्ये मृत पाल आढळली होती. हे प्रकरण ताज असताना बदलापूर पश्चिमेकडील ओम साई स्नॅक्स कॉर्नर, या दुकानामध्ये असाच धक्कादायक प्रकार घडला. पालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात दुकानाच्या मालकाचा मुलगा शैलेश चौधरी याने या वडापावमध्ये पाल आढळल्याचे मान्य केले.