Bacchu Kadu : "फक्त फेसबूकवर पोकळ.., बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार 'प्रहार'

बोलबच्चन करुन थोडीच होतं, बच्चू कडू (Bacchu Kadu) यांची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या जोरदार टीका.

Updated: Dec 14, 2022, 05:42 PM IST
Bacchu Kadu : "फक्त फेसबूकवर पोकळ..,  बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार 'प्रहार' title=

Bacchu Kadu On Uddhav Thackeray :  बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचेप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार प्रहार केलाय.  फक्त फेसबूकवर (Facebook) पोकळ गोष्टी बोलून चालत नाहीत, असा टोला कडू यांनी ठाकरे यांना लगावलाय. तर कडू यांच्या टीकेला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जिथे 'सत्ता तिथे बच्चू कडू' असं प्रत्त्युत्तर दिलं आहे. तसेच कडू यांनी आधी 50 खोक्यांचा हिशोब द्यावा असं विधानपरिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी म्हटलं.  (bacchu kadu criticize to uddhav thackeray answered by sanjay raut ambadas danve maharashtra politics)

बच्चू कडू काय म्हणाले? 

"निव्वळ फेसबूकवर येऊन पोकळी गोष्टी बोलून चालत नाही. उतरावं लागतं.  घरी स्वंयपाक केला नाही आणि सांगितलं कोबीची भाजी चांगली झाली. पण ताटात कुठे आहे? कोबीची भाजी चांगली झाली ताटात आणावं लागेल ना. पोट भरलं पाहिजे ना. बोलबच्चन करुन थोडीच होतं. कर्म आणि कर्तव्य करावं लागतं त्यासाठी. धावावं लागतं, मेहनत करावी लागते, घाम गाळावा लागतो. तसेच वेळ आली तर रक्त सांडण्याची तयारी ठेवावी लागते. हे बच्चू कडूने केलं आहे", अशा शब्दात कडू यांनी ठाकरे यांना फेसबूक लाईव्हच्या मुद्द्यावरुन टोला लगावलाय. कडू अमरावतीतील पिंपळखुटा इथे संत कृपा क्रीडा मंडळाद्वारे आयोजित कबड्डी सामन्यात मनोगत व्यक्त करताना ही टोला लगावला. 

संजय राऊत यांचं प्रत्त्युत्तर

बच्चू कडू कुणावरही टीका करु शकतात आणि कुणालाही पाठींबा देऊ शकतात. उद्या जर आमचं सरकार आलं तर ते आमची पालखी घेऊन पुढे असतील. तर सत्ता आली की काही जण पुढे असतात त्यांना आमंत्रणाची गरज नसते. ते चिपळ्या वाजवायला पुढे असतात", असं सडेतोड उत्तर राऊत यांनी कडूंना दिलंय. तर "कडू यांनी रवी राणा यांनी केलेल्या 50 खोक्यांबाबत उत्तर द्याला हवं मग बाकीच्या विषयावर बोलायला हवं", असं अंबादास दानवे म्हणाले.